अर्थराज्य - २०१७
अर्थराज्य - २०१७ हे लेखक एन. श्याम यांचे पुस्तक स्पर्धा परीक्षांना बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयोगी आहे. लेखकाने हे पुस्तक UPSC, MPSC, NET, SET, बँकिंग, इतर सर्व स्पर्धा परिक्षा डोळ्यांसमोर ठेवून लिहिले आहे. भारतीय अर्थव्यवस्था व भारतीय राज्यघटने संदर्भातील चालू घडामोडींसाठी उपयुक्त पुस्तक असाही लेखकाचा दावा आहे. भारतीय अर्थव्यवस्थेशी निगडित असे ५० भाग आणि राज्यघटना, राजकारण व कायदे यांच्याशी संबंधित ७० भाग अशी विभागणी या पुस्तकाची आहे. पारंपरिक विषयाच्या जोडीला नव्या विषयांची जोड अर्थराज्यमध्ये आहे. भारत इंटरफेस फॉर मनी (BHIM अॅप), पहिले बौद्धिक संपत्ती अधिकार धोरण २०१६, राष्ट्रीय एलईडी कार्यक्रम (UJALA), भारतीय टपाल आणि देयक बँका, भारतीय सुवर्ण नाणी वितरणाचा पहिला मान आयओबीला, ब्रेग्झिट आणि परिक्षेला जाता जाता हे काही महत्वाचे विषय अर्थशास्त्रात हाताळले आहेत. दुसऱ्या भागात अशीच रचना आहे. पारंपरिक विषयांबरोबर कायदा, दिल्लीत लाभाचे पद आप सरकारसाठी असंवैधानिक, लोढा समितीचा अहवाल अशा घडामोडींचा आढावा घेतलेला आहे.
पृ. २७२ मुल्य - १६०
डॉ. प्रा. गणेश द. राऊत
over 4 years ago
over 4 years ago
over 4 years ago
over 4 years ago
almost 5 years ago