Loader

Blog Post

15.05.2017 current graph varshiki
Posted on by . Posted in MPSC Preparation. Tagged Books, MPSC Preparation, MPSC Exam.

Current Graph Varshiki 2017

करंट ग्राफ वार्षिकी २०१७  

करंट ग्राफ वार्षिकी २०१७ असे मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांमध्ये मुखपृष्ठ असणारे २३० पृष्ठांचे पुस्तक स्पर्धा परीक्षांसाठी उत्तम साहित्य आहे. या परिक्षेला बसू इच्छिणाऱ्याने २०१६ साल At a glance पहायचे, अभ्यासावयाचे ठरविल्यास हे पुस्तक महत्वाचे आहे. व्यक्तिगत जीवनात आपण खूप कमी नोंदी करतो. राष्ट्रीय जीवनात रोज घडणाऱ्या घडामोडी अत्यंत महत्वाच्या असतात. वर्तमानात घडणाऱ्या घडामोडी क्षणार्धात भूतकाळात जमा होऊन भविष्याला आकार देऊ शकतात. एकूण २७ प्रकरणांमध्ये हे पुस्तक विभागले गेले आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी, आंतरराष्ट्रीय संस्था यांचा आढावा घेतल्यावर संकल आणि संपादक वाचकाला संकीर्ण राष्ट्रीय घडामोडींकडे घेऊन जातात. राष्ट्रीय घडामोडींच्या बरोबरच राज्यवार घडामोडी सुद्धा यात आलेल्या आहेत. २०११ च्या जनगणनेची माहिती सुद्धा यात दिली आहे. स्टीलफ्रेम सिव्हिल्स इंडिया एज्युकेशन बुक्सने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यवार चालू घडामोडींचा विश्लेषणात्मक वेध घेतला आहे. तो वाचायलाच हवा.

पृ. २३१  मुल्य – १५०

डॉ. प्रा. गणेश द. राऊत

Posted on by . Posted in MPSC Preparation. Tagged Books, MPSC Preparation, MPSC Exam.

Categories

Tag cloud

Recent entries

Archive