शालेयज्ञान प्लसचा परिचय
‘ESI PSI STI ASO पूर्व परीक्षा मार्गदर्शक (गाईड)’ हे बी पब्लिकेशनचे पुस्तक विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहे. अवघ्या आठ महिन्यात त्याच्या ३ आवृत्या निघाल्या आहेत. PSI-STI-ASO अशा तीन पूर्वपरीक्षांसाठी मार्गदर्शन म्हणून हे पुस्तक लिहले आहे. लेखकाच्या भाषेत तो 'ठोकळा' आहे कारण ८६४ पृष्ठे या पुस्तकात आहेत. केवळ याच परीक्षा नव्हे तर MPSC दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, excise sub inspector-c साठी सुद्धा उपयुक्त असा लेखकाचा दावा आहे. या पुस्तकात संपूर्ण संविधान घटना दुरुस्तीसह आणि विश्लेषणात्मक माहितीसह दिले आहे. शालेय अभ्यासक्रमाच्या ५ ते १२ पर्यंतच्या वनलाईनर नोट्स, NCERT टच २०१३ ते २०१६ पर्यंत झालेल्या सर्वच परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचे स्पष्टीकरणात्मक विश्लेषण दिलेले आहे. २०१६ मध्ये शासनाने STI च्या पूर्वपरीक्षेत विचारलेल्या प्रश्नांपैकी १९ प्रश्न याच गाइडमधील होते. यामुळेच पुस्तकाच्या ३ आवृत्या निघाल्या आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जी किमान माहिती असणे अपेक्षित आहे ती या पुस्तकातून मिळते. विद्यार्थ्यांची माहितीची भूक भागविण्याचे सामर्थ्य या पुस्तकातून मिळते.
पृष्ठे ८६४ मूल्य - ४२५
प्रा. डॉ. गणेश द. राऊत
about 4 years ago
over 4 years ago
over 4 years ago
over 4 years ago
over 4 years ago