Loader

Blog Post

Mpsc exam pre preparation
Posted on . Posted in MPSC Preparation. Tagged Entrance Exam, MPSC Preparation, MPSC Exam, Exam Tips.

MPSC आणि त्याची पूर्व तयारी

 

MPSC च ध्येय गाठायचं, पण कसं ? यासाठी कष्ट हि अशी प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या दिशेने नेते. ध्येय जितके मोठे तितकेच त्याची प्राप्ती करणे कठीण आहे पण अशक्य देखील नाही, ध्येयाला कष्टाची जोड यश प्राप्तीसाठी पूरक असते.

"ध्येय गाठण्यासाठी जिद्द व त्यासाठी कष्टाचे परिमाण मोजावे लागेल."

MPSC राज्यसेवा परीक्षा  कठीण मानली जाते, पण आयुष्यात सोपं असं काही नाही, मेहनत तर लागणारच..

 

उदाहरणार्थ :- काही दिवसांपूर्वी तुम्ही वाचले असाल कि बँजो वाजवणारा एक सामान्य तरुण, मेहनत करून पोलीस सबइन्स्पेक्टर बनला. जर तो हे करून दाखवू शकतो तर आपण का नाही !

 

MPSC  (Maharashtra Public Service Commission ) परीक्षा हि महाराष्ट्र लोकसेवा आयोग आयोजित करते, ज्यामध्ये महाराष्ट्रातील विविध भागामधून मुले सहभागी होतात . परीक्षेमध्ये  काहीजणांना लवकर यश मिळते, तर काहीजणांना यश मिळण्यासाठी वेळ लागू शकतो. पण अपयश हि यशाची  पहिली पायरी आहे हे लक्षात ठेवून, न हारता जिद्दीने कष्ट घेणे सोडू नये. स्पर्धा परीक्षेच्या तयारी साठी परिश्रमासोबत योग्य मार्गदर्शनाची जोड असावी.   

 

तुम्ही MPSC  परीक्षेसाठी तयारी करत आहात, किंवा तयारी करण्यासाठी सज्ज आहात, पण कळत नसेल  कि सरुवात कशी करावी, काय आधी करावं, कुठले टप्पे पूर्ण करावेत असे खूप सारे प्रश्न तुम्हाला पडत असतीलच ,

तर MPSC ची तयारी करणाऱ्या सगळ्या मित्रांसाठी मी  काही गोष्टी सांगू इच्छितो, ज्या गोष्टी तुम्हाला परीक्षेत यश मिळवण्यासाठी नक्कीच  फायदेशीर ठरतील.

पण १ अट आहे ह्या सगळया गोष्टींची तयारी तुम्हाला आतापासूनच करावी लागेल... तयार आहात ना मग ??

 

MPSC परीक्षा म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा हि ३ टप्प्यांमध्ये विभागलेली आहे

एमपीएससी पूर्व परीक्षा  

एमपीएससी मुख्य परीक्षा

मुलाखत

 

ह्या परीक्षेचा अभ्यास नीट करण्यासाठी आणि तयारीच्या वेळेस येणारा तणाव कमी करण्यासाठी पुढील गोष्टी नक्की करा .

 

१. परीक्षेसंबंधी मार्गदर्शक तत्त्वे वाचा.

परीक्षेच्या निकषांमध्ये परीक्षाशी संबंधित माहिती समाविष्ट असते त्यामध्ये  महत्वाच्या तारखा, पात्रता मापदंड, रिक्त जागा आणि परीक्षेसाठी अद्ययावत अभ्यासक्रम ह्या सगळ्या गोष्टींचा आराखडा असतो. त्या सर्व  गोष्टी संबंधित आवश्यक  मार्गदर्शक तत्वे घ्या.

उदा: तुम्हाला ज्या पदासाठी तयारी करावयाची आहे त्या साठी आवश्यक विषयांची यादी, अभ्यासक्रमाची सूची  तयार  करा, जी तूम्हाला पुढील तयारी साठी फायदेशीर ठरेल.

 

2. परीक्षेचा पॅटर्न नीट समजून घ्या.

सर्व परीक्षा नमुना, विषय, कोणत्या प्रकारच्या प्रश्नांसाठी किती गुण आहेत, किती प्रश्न विचारले जातात या सर्वबाबी  काळजीपूर्वक वाचा. परीक्षेचा पॅटर्न एकदा लक्षात आला कि कोणत्या प्रकारच्या प्रश्नांची तयारी करावी, कोणत्या topics ला किती प्राधान्य द्यावे, प्रत्येक विषयाला किती दिवस देता येतील याचे नियोजन करता येईल.

 

३. टाइम मॅनेजमेंट

वरील दोन्ही गोष्टी केल्यामुळे तुम्हाला वेळापत्रक  करायला मदत होईल.वेळापत्रक तयार करा आणि ते पाळा देखील. विषयानुसार आवश्यक वेळ आणि इतर  गोष्टीला वेळ द्या जसे कि वृत्तपत्र वाचणे, चालू घडामोडी पाहणे, थोडा वेळ संवांद करणे अश्या प्रत्येक गोष्टीसाठी वेळ ठरवा. वेळापत्रक नीट पाळल्यामुळे लक्ष प्राप्तीसाठी फायदा हॊईल .

 

४. मूळ संकल्पना  समजून घ्या

सर्व विषय मुळापासून समजून घ्या. परीक्षेमध्ये असे प्रश्न असतात जिथे कन्सेप्ट आणि गाभा जर तुम्हाला नीट समजला तर तुम्ही सहजरित्या उत्तर देऊ शकता. फक्त पोपटपंची न करता विषयाच्या मुळावर भर द्या.

 

५. प्रशिक्षण आणि अभ्यास साहित्य

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेद्वारांमांध्ये झपाट्याने वाढ होत आहे आणि स्पर्धा परीक्षा अधिकाधिक  कठीण होत चालली आहे . ह्या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी तुम्हाला भरपूर अभ्यासासोबत इतर प्रशिक्षण केंद्रांचा, अभ्याससाहित्याचा उपयोग होतो ज्यामुळे तुमच्यातील उणीव भरून काढण्यासाठी तसेच update मिळावयास सोपे जाते. अनेक व्हाट्सअप ग्रुप्स देखील आहेत जे स्पर्धा परीक्षेच्या इतर गोष्टी share करतात. सर्व विषयांसाठी अधिक अभ्यासक्रम कव्हर केले असलेले एक refrence पुस्तक घ्या. तयारीसाठी लागणारे सर्वोत्तम अभ्यास साहित्य आणि संदर्भ पुस्तके  देखील निवडणे कठीण काम आहे. Cart९१ ह्या पोर्टल वर तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेची तयार करण्यासाठी लागणारे पुस्तक उपलब्ध आहेत . जे मुख्यतः mpsc प्रवेश परीक्षा पुस्तके आणि अभ्यास सामग्रीवर केंद्रित आहे.  

 

६. गति आणि अचूकता वाढवा

प्रत्येक सेकंद महत्त्वाचा आहे आणि आपल्याला त्याचा उत्कृष्ट वापर करावा लागतो. या साठी मंत्र फक्त एकच सराव आणि फक्त सराव.  ह्यामुळे परीक्षा पेपर सोडवण्याची गती वाढते, ज्यामुळे कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडवू शकता आणि तुमचा आत्मविश्वास वाढण्यासही मदत होईल.

 

७.  सराव धोरण

तुम्ही सरावाचे महत्त्व नक्की जाणता. अभ्यास केलेल्या विषयांचा नियमित सराव  करा. सतत सराव केल्यामुळे शेवटच्या वेळी तुम्हाला त्रास होणार नाही. अभ्यास केलेल्या विषयाचा नियमित सराव आणि त्यानुसार आपल्या अभ्यास योजनांमध्ये बदल करा. परीक्षेआगोदर  उजळणी साठी कमीत कमी २० ते ३० दिवस बाजूला ठेवा.

 

८. मॉक टेस्ट आणि मागील वर्षाचे पेपर्स

मागील वर्षीच्या प्रश्नप्रत्रिकेमुळे प्रश्नांचे प्रकार व पॅटर्न समजायला मदत होते. नकली चाचणी घेऊन आपल्या तयारीची चाचणी घ्या, हे आपल्याला आपल्या कमकुवत विषय आणि topics बद्दल जाणण्यास मदत करते, जेथे आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे त्याचे विश्लेषण करण्यास मदत होईल.

 

९. आत्मबळ  वाढवा

स्पर्धा परीक्षांची तयारीसाठी खूप आधीपासून तयारी गरजेचे असते. अभ्यासाला बसताना कधी कधी अभ्यास करण्याचा कंटाळा येणे, अभ्यास न करावासा वाटणे साहजिक आहे, अश्या गोष्टी टाळण्यासाठी आणि आत्मबळ वाढवण्यासाठी  रोज थोडा वेळ योगा करणे, चालायला जाणे , व्यायाम करणे,  ह्या गोष्टींसाठी देखील वेळ काढावा , ज्यामुळे विचारांना नियंत्रित करणे सोपे जाईल आणि अभ्यास करताना उत्साह वाटेल, आकलन क्षमता वाढेल .

 

१०.  तणावमुक्त राहा.

तणावमुक्त राहण्यासाठी तुमच्या आवडीच्या गोष्टी नक्की करा. ज्यामुळे तुम्हाला ताजे तवाने वाटेल आणि पुन्हा जोमाने तुम्ही कामाला लागू शकाल.

उदाहरणार्थ :- ज्यांना अभ्यास करताना  टेन्शन येतं त्यांनी तणाव  घालवण्यासाठी आठवड्यातून १ तरी कॉमेडी मूवी नक्की पाहावा. मस्तपैक्की दीड ते दोन तास भरपूर हसून पुन्हा नव्या जोमाने अभ्यासाला सुरुवात करावी.

 

लक्षात ठेवा ह्या सगळ्या गोष्टी तेव्हाच फायदेशीर ठरतील जेव्हा तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात त्या अमलात आणाल.  सततचे परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनामुळे तुम्हाला कमी वेळेत यश नक्कीच  मिळेल.

 

तर मग वाट कशाची बघताय, लागा तयारीला !!

 

आपण आपल्या परीक्षांसाठी नियोजन कसे करता ? यावर टिप्पणी विभागात आपले मत नक्की  शेअर करा.

 

Posted on . Posted in MPSC Preparation. Tagged Entrance Exam, MPSC Preparation, MPSC Exam, Exam Tips.

Categories

Tag cloud

Recent entries

Archive