UPSC व MPSC परीक्षेसाठी NCERT मराठी सारांश (इतिहास, राज्यघटना, भूगोल, अर्थशास्त्र) अशा प्रचंड मोठ्या शीर्षकाचे पुस्तक विभोर बोठे आणि कपिल हांडे यांनी लिहिले आहे. पुण्यातील स्पर्धा परीक्षांच्या विश्वातील युनिक अॅकॅडमीने ते प्रसिद्ध केले आहे. NCERT वर आधारीत परीक्षाभिमुख मांडणी असलेले मराठीतील एकमेव पुस्तक अशी या पुस्तकाची जाहिरात करण्यात आलेली आहे. यात इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या NCERT च्या अभ्यासक्रमाचा सारांश आहे. परीक्षाभिमुख मांडणी केल्यामुळे ते विद्यार्थांना उपयोगी आहे.
NCERT ची पुस्तके इंग्लिश आणि हिंदी भाषेत असतात. त्यामुळे मराठी भाषेतून शिक्षण झालेल्या आणि स्पर्धा परीक्षांना बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे संदर्भ क्षणार्धात मराठीत उपलब्ध व्हावेत म्हणून युनिकने हा उपक्रम केला आहे. नकाशे, चौकटी, आकडेवारी यांच्या माध्यमातून पुस्तक अधिक दर्जेदार केले आहे. या पुस्तकामुळे विद्यार्थ्यांची एक गैरसोय कमी झाली आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यशाचा टक्का वाढण्यास हे पुस्तक उपयोगी पडू शकते.
पृष्ठे ३३६ मूल्य - २५० रु
प्रा. डॉ. गणेश द. राऊत
over 4 years ago
over 4 years ago
over 4 years ago
over 4 years ago
almost 5 years ago