स्पर्धा परीक्षांना बसण्याचा निश्चय करणाऱ्या मुलांमध्ये महाराष्ट्राचे प्रमाण लक्षणीय आहे. परीक्षेला बसणाऱ्यांच्या संख्येत मराठी टक्का वाढला तरी उत्तीर्ण होणारांमध्ये मराठी टक्का वाढण्याची गरज आहे. यासाठी खूप लवकर आणि सखोल तयारी करण्याची गरज आहे. ही तयारी कोठे आणि कशी करायची ? असा एक पक्षप्रश्न नावोदितांपुढे असू शकतो.
राज्य शासनाने पुढाकार घेऊन १९७६ मध्ये मुंबईत राज्य व्यवसाय शिक्षण संस्थेची स्थापना केली. १९८५ मध्ये नागपूर, औरंगाबाद आणि कोल्हापूर येथे भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले. २०१३ मध्ये नाशिक व अमरावती येथे ३ प्री – आयएएस ट्रेनिंग सेंटर्स सुरु करण्यात आले. २०१३ च्या जानेवारीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या संस्थेकडून उच्च शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील प्रत्येक भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षणासाठी प्रायोजित करण्यात आलेल्या अनुसूचित जातीच्या १० विद्यार्थ्यांना मुंबई, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, आणि नाशिक येथे प्रवेश देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
या व्यतिरिक्त स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने लोकराज्य – फेब्रुवारी २०१७ चा अंक आवर्जुन वाचलाच पाहिजे. लोकराज्य – फेब्रुवारी २०१७ या फक्त ६० पृष्ठांच्या अंकात विद्यार्थ्यांसमोर स्पर्धा परीक्षांचे अंतरंग विविध लेखकांनी उलगडून दाखविले आहे. ‘अशा सेवा अशा संधी’ या लेखात भारतीय प्रशासनिक सेवा, भारतीय पोलिस सेवा, भारतीय वन सेवा, भारतीय विदेश सेवा, भारतीय महसूल सेवा, भारतीय रेल्वे सेवा, भारतीय लेखा परीक्षण व लेखा सेवा, भारतीय व्यापार सेवा, भारतीय आयुध निर्माण सेवा, दिल्ली, अंदमान आणि निकोबार बेटे नागरी सेवा, भारतीय पोस्ट व टेलिग्राम सेवा व वित्तसेवा, दिल्ली, अंदमान आणि निकोबार बेटे पोलिस सेवा यांची माहिती दिली आहे.
आपल्याला अनेकदा या प्रशासकीय सेवांची वरवरची माहिती असते. IAS व IPS या परीक्षांच्या पलीकडे सुद्धा एक जग आहे याची जाणिव या अंकामुळे व्हायला मदत होईल. यातील भारतीय विदेश सेवा हा भाग हा भाग वाचल्यास आपणास परीक्षोत्तर कालखंड समजण्यास मदत होते. या सेवेची माहिती, जबाबदाऱ्या, प्रशिक्षण, मुत्सद्देगिरी : एक कला, परराष्ट्र मंत्रालय, नेमणुका या क्रमाने माहिती दिली आहे. ज्यांना या सेवेत जाऊन करियर करावयाचे आहे त्यांच्यासाठी या अंकातील हा लेख उपयुक्त आहे.
या अंकात अशा सेवा, अशा संधी ! तयारी नागरी सेवा परीक्षेची, तुम्ही जिंकणारच, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण, नागरी सेवा : टप्पा मुलाखतीचा, राज्यसेवा, यशाची प्रेरणा, करियर कसे निवडावे ? डिजिटल मार्केटिंग, नवे क्षेत्र, बँकर व्हा, फिटनेस गुरु, व्यवसाय शिक्षण : रोजगाराची हमी, आत्मविश्वास महत्वाचा, सेवा आणि समाधान, व्हा ‘माध्यम’ कार, फाईन आर्ट : फाईन करियर, कृषी कौशल्य, माध्यम संवादाची : जनतेच्या विश्वासाची, वैश्विक मराठी असे जवळपास १९ लेख आहेत. या लेखांमधून स्पर्धा परीक्षा, करियर यांचे अंतरंग वाचकांपुढे उलगडण्यात आले आले आहे. स्पर्धा परीक्षांचा नव्याने अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा अंक संग्रही ठेवला पाहिजे.
सदर अंक महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने प्रकाशित केला जातो. स्वतंत्र अंकाची किंमत दहा रुपये आहे. वार्षिक वर्गणी १०० रुपये आहे. वार्षिक वर्गणी भरल्याचा फायदा २० रुपये वाचतात. सध्या आपल्याला एक रुपया सुद्धा वाचविणे महत्वाचे आहे.
Buy Lokrajya February 2017 Online
over 4 years ago
almost 5 years ago
almost 5 years ago
about 5 years ago
about 5 years ago