Loader

Blog Post

Mpsc pre exam groupc
Posted on by . Posted in MPSC Preparation. Tagged MPSC Preparation, MPSC Exam, Competitive Exam.

महाराष्ट्र गट - क सेवा पूर्वपरीक्षा (MPSC Grade-C Examination)

Maharashtra Public Service Commission issued the notification of recruitment for 862 posts in various state government department for the position of Secondary Supervisor, State Excise, Group-c, Tax Assistant, Group-c, Clerk-Typist (Marathi), Group-c and Clerk-Typist (English), Group-c. The last date for the application is 11 April and the exam will schedule in month of June.

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील एकूण ८६२ पदांच्या  भरतीकरीता लोकसेवा आयोगाकडून ऑनलाईन पद्धतीने ११ एप्रिल, २०१८ पूर्वी अर्ज मागविण्यात येत आहेत. परीक्षा १० जून २०१८ रोजी घेण्यात येणार आहेत. यामध्ये दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क गट 'क' च्या एकूण ३३ जागा, कर सहायक गट क एकूण ४७८ जागा,लिपिक टंकलेखक (मराठी) गट क एकूण ३१६ जागा, लिपिक टंकलेखक (इंग्रजी) ३५ जागा सर्व पदासाठी पूर्वपरीक्षा एकत्र घेण्यात येईल.

Total Vacancies for MPSC Grade-C Examination

 

Name of Division Name of Post Total Post
Home Division

Secondary Supervisor,

State Excise,

Group-c

33

Finance Department

 

Tax Assistant,Group-c 478
General
Administration
Department

Clerk-Typist (Marathi),

Group-c

316

Clerk-Typist (English),

Group-c

35
  Total Post  862

 

MPSC 2018 issued the notification for the recruitment of 33 posts of Group-C, Beside openings are for the designation of Secondary Supervisor, State Excise, Group-C. Interested candidate can apply till 11 April. The exam for above posts will scheduled in June. 

Secondary Supervisor, State Excise, Group-C 

Let’s get some details on Secondary Supervisor, State Excise, Group-C examination with examination pattern, syllabus, salary, eligibility criteria.  

 • वेतन (Salary)  

दुय्यम निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क - ५२००-२०२०० ग्रेड ३५०० + भत्ता

Secondary Supervisor, State Excise, Group-c :

Basic- 5200-20200

Grade 3500+Incentive

 • वयोमर्यादा (Age Criteria) :
 • दुय्यम निरीक्षक - अमागास - ३८ वर्षे, मागासवर्गीय ४३,

Secondary Supervisor- Open 38 Years, SC/ST/OBC- 43

 • दुय्यम निरीक्षकपदासाठी (Secondary Supervisor)
 • शारीरिक अर्हता - पुरुष
 • उंची - १६५ सेंमी
 • छाती - ७९ सेंमी, फुगवून ५ सेंमी जास्त.
 • शारीरिक अर्हता - महिला
 • उंची १५५ सेंमी
 • वजन - ५० किलो किमान असावे.

Here are some of the best reference books for the MPSC Secondary Supervisor, State Excise, Group-C

 1. Chalu Ghadamodi Diary Ank - 5
 2. Panchayat Raj
 3. Chalu Ghadamodi 2018
 4. Spardha Pariksha Samgra Buddhimatta Chachani
 5. Maharashtracha Bhugol
 6. Bhartiya Arthvyavastha Bhag 1
 7. Bhartachi Rajyaghatna Aani Prashasan
 8. Adhunik Bhartacha Itihas Vishleshanatmak Vastunishth Prashnsanch
 9. Bhartachi Rajyaghatana Vastunishtha Prashnsanch
 10. Sampurn Vidnyan

 

Tax Assistant, Group-C

MPSC 2018 issued the notification for the recruitment of 478 posts of Group-C, Beside openings are for the designation of Tax Assistant, Group-C. Interested candidate can apply till 11 April. The examination for above posts will be held in June.

Let’s get some details on Tax Assistant, Group-C examination with examination pattern, syllabus, salary, eligibility criteria.

 

 • वेतन (Salary)  

कर सहायक - ५२००-२०२०० ग्रेड - २४०० + भत्ता

Tax Assistant, Group-C:

Basic- 5200-20200

Grade 2400+Incentive

 • वयोमर्यादा (Age Criteria) :
 • कर सहायक - अमागास - ३८ वर्षे, मागासवर्गीय ४३,

Tax Assistant, Group-C - Open 38 Years, SC/ST/OBC- 43 Years

 • कर सहायक (Typing Speed) - मराठीचा वेग ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी ४० शब्द प्रति मिनिट या पात्रतेसाठी शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र लागेल.

Here are some of the best reference books for the MPSC Tax Assistant, Group-C Examination

 1. Tax Assistant Purva Pariksha
 2. Tax Assistant 1500+ Sarav Prashnsanch
 3. Tax Assistant Lekhi Pariksha

 

Clerk-Typist (Marathi), Group-C and Clerk-Typist (English), Group-C

MPSC 2018 issued the notification for the recruitment of 351 posts of Group-C, Beside openings are for the designation of Clerk-Typist (Marathi), Group-C and Clerk-Typist (English), Group-C. Interested candidate can apply till 11 April. The exam for above posts will scheduled in June.

Let’s get some details on Clerk-Typist (Marathi), Group-C and Clerk-Typist (English), Group-C examination with examination pattern, syllabus, salary, eligibility criteria.  

 

 • वेतन (Salary)  

लिपिक टंकलेखक - ५२००-२०२०० ग्रेड - १९०० + भत्ता

Clerk-Typist, Group-C:

Basic- 5200-20200

Grade 1900+Incentive

 • वयोमर्यादा (Age Criteria) 
 • लिपिक टंकलेखक - अमागास - ३८ वर्षे, मागासवर्गीय ४३,

Clerk-Typist, Group-C - Open 38 Years, SC/ST/OBC- 43

 • लिपिक टंकलेखक (Clerk-Typist (Marathi), Group-C and Clerk-Typist (English), Group-C) -
 • मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट इंग्रजी - टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रतिमिनिटचे उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक.
 • संगणक टंकलेखन अर्हता, बेसिक कोर्स इन कॉम्प्युटर टायपिंग मराठी ३० शब्द प्रतिमिनिट अथवा बेसिक कोर्स इन कॉम्प्युटर टायपिंग इंग्रजी ४० शब्द प्रति मिनिट समकक्ष अर्हता स्वीकार्ह आहे.
 • शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाची उपरोक्त टंकलेखन अर्हता मुख्य परीक्षेकरिता अर्ज सादर करण्यात अंतिम दिनांकापर्यंत प्राप्त करणे आवश्यक आहे.*
 • परीक्षा शुल्क : अमागास ३७४ तर मागासवर्गीय २७४, माजी सैनिक २४.

Here are some of the best reference books for the MPSC Clerk-Typist (Marathi), Group-C and Clerk-Typist (English), Group-C.

 1. MPSC Lipik-Tanklekhak Purv Pariksha Prashnsanch
 2. Lipik Tanklekhak Sampurna Margadarshak
 3. Lipik Tanklekhak Purv Pariksha
 4. 111 Jambo Lipik Tanklekhak
 5. Lipik Tanklekhak - Sampurna

 

 • परीक्षेचे टप्पे :
 • पूर्व परीक्षा १०० गुण
 • मुख्य परीक्षा २०० गुण.

 

 • Exam Pattern:

 

  • Preliminary Examination - 100 Marks
  • Main Examination - 200 Marks
 • पात्रता (Eligibility Criteria) :
 • भारतीय नागरिक असावा (Candidate should be an Indian National).
 • विद्यापीठाची पदवी किंवा समतुल्य अर्हता, पदवी (Degree from the Recog. University)
 • शेवटच्या वर्षातील उमेदवार पूर्व परीक्षा देऊ शकतो. (Final Year Student can appear for Examination)
 • उमेदवाराला मराठी वाचता, लिहिता, बोलता येणे आवश्यक(Candidate must be fluent in Marathi).

अभ्यासक्रम व संदर्भ (Syllbus of MPSC Grade-C Examination ) : पूर्व परीक्षा १०० प्रश्न व १०० गुण, वेळ १ तास, प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ट व बहुपर्यायी स्वरूपाची.

चालू घडामोडी (Current Affairs) : जागतिक तसेच भारतातील चालू घटना, साधारणपणे मागील १ वर्षापर्यंतच्या घटना माहित असणे आवश्यक. यासाठी अभिनव प्रकाशनचे किंवा सकाळ प्रकाशनाचे वार्षिकी करा.

नागरिकशास्त्र (Civics) : यामध्ये भारताच्या घटनेचा प्रामाणिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन, ग्रामप्रशासन या घटकांचा समावेश यासाठी १२ राज्यशास्त्र, रंजन कोळवे सरांचे राज्यघटना व सुधाकर जोशी सरांचे भारताचे शासन राजकारण व महाराष्ट्राची प्रशासकीय व्यवस्था - के.आर.बंग सरांचे पुस्तक उपयुक्त ठरेल.

इतिहास (History) : आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास या विषयांचा आवाका खूप असल्यामुळे मोजकेच व महत्त्वाचे वाचन उपयुक्त ठरेल. यासाठी ८ वी, ११ वी इतिहास, कुमार केतकर यांचे कथा स्वातंत्र्याची पुस्तक, महाराष्ट्राचा इतिहास - डॉ. अनिल कठारे किंवा माढाळ, केसागर प्रकाशनाचे  महाराष्ट्राचा इतिहास हा संदर्भ चांगला आहे.

भूगोल (Geography) : यामध्ये पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अंशाश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी अभ्यासक्रमाचा समावेश होतो.  यासाठी ४ थी ते १२ वी भूगोल, सवदी सरांचे दीपस्तंभ प्रकाशनाचे महाराष्ट्राचा भूगोल हे पुस्तक चांगले आहे.

अर्थव्यवस्था (Economics) : भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकीय नीती,  शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षा इ. यासाठी ११ वी, १२ वी अर्थशास्त्र क्रमिक पुस्तके, भारतीय अर्थव्यवस्था - रंजन कोळंबे, अर्थव्यवस्था - देसले व चालू घडामोडी या घटकांचा संदर्भ घ्या.

सामान्य विज्ञान (General Science): यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र या मुद्द्यांचा समावेश आहे. , या घटकासाठी ४ ते १२ वी क्रमिक पुस्तके. सामान्यविज्ञान - अनिल कोलते व कृषिगंगा प्रकाशनाचे सामान्यविज्ञान हे पुस्तक करा. विज्ञानघटक समजून घेऊन करा. पाठांतराचा उपयोग नाही.

बुद्धिमापन चाचणी (Intelligence) : समग्रबुद्धिमापन चाचणी - अभिनव प्रकाशन व किरण गायकवाड सरांचे बुद्धिमापन चाचणी व केसागर प्रकाशनाचे सराव बुद्धिमापन चाचणी सोडवा.

अंकगणित (Mathematics): या घटकासाठी गणित गुरु किंवा मॅजिक ऑफ मॅथ्स - नितीन महाले सरांचे पुस्तक उपयुक्त ठरेल.

अभ्यासाची दिशा (Preparation tips) :

 • सर्वप्रथम झालेले पेपर आणि शालेय क्रमिक पुस्तके वाचून काढा व त्याला एक संदर्भ पुस्तकाची जोड द्या.
 • मागील परीक्षांचे सराव प्रश्नसंच भरपूर सोडवा.
 • आयोगाच्या प्रश्नाचे स्वरूप बघून स्वतः तसे प्रश्न तयार करा. तीच तीच पुस्तके वाचत बसू नका.
 • एकदा संकल्पना समजून घेतली की सरावावर भर द्या.
 • चालू घडामोडी, विज्ञान, गणित व बुद्धिमापन हे घटक पक्के करून ठेवा.
 • आयोगाने मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
 • सर्वांसाठी पेपर क्रमांक १ - १४ ऑक्टो. २०१८, लिपिक टंकलेखक - २१ ऑक्टो.
 • २०१८, दुय्यम निरीक्षक - ४ नोव्हेंबर २०१८, कर सहायक २ डिसेंबर २०१८. त्यामुळे वेळेचे नियोजन करून अभ्यासाला सुरुवात करा.

अधिक माहितीसाठी www.mahampsc.mahaonline.gov.in यावर संपर्क करा.

Posted on by . Posted in MPSC Preparation. Tagged MPSC Preparation, MPSC Exam, Competitive Exam.

Categories

Tag cloud

Recent entries

Archive