Loader

Blog Post

Ravansatya
Posted on . Posted in Marathi Literature. Tagged Marathi Literature.

Ravansatya: The Untold Secrets of Ravan

रावणसत्य 

 

"रावण "

हा  शब्द ऐकताच कशाप्रकारची प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर येते?

एक  खलनायक, हिंस्र, क्रूर,  अहंकारी आणि रामायणामध्ये विरोधी  व्यक्तीरेखा असलेली व्यक्ती, अशी हि लंकाधिपती रावण यांची  नकारात्मक  प्रतिमा  आपल्या मनात वर्षानुवर्षे बिंबवली गेलेली आहे. आपण त्यांना  दशावतार, मायावी आणि लंकेचा राजा म्हणूनच ओळखतो आणि त्यामुळेच आजही आपण धर्माचा अधर्मावर  आणि चांगल्याचा वाईटावर विजय म्हणूनच प्रत्येक विजयादशमी ला रावण दहन करतो.

पण  तुम्ही खरंच  पूर्ण सत्याशी अवगत आहात का? आणि कोणी तुम्हाला म्हणाले रावण हा एक तपस्वी, बुद्धीमानी, पराक्रमी चांगला राजा होता तर ? तुम्ही सहमत व्हाल ?

 

कदाचित नाही!

 

हा लहानसा लेख, तुम्हाला नक्कीच रावणाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देऊ शकतो. रावण यांचे  जीवन फक्त ऐकण्यासारखेच नाही तर अभ्यासण्यासारखे  देखील आहे.

तुम्हाला माहित आहे का? ते सर्वश्रेष्ठ शिवभक्त होते. जगाच्या इतिहासांत एवढा मोठा भक्त कधीच होऊ शकत नाही. मोठी महत्वकांक्षा बाळगणारे, प्रबळ इच्छाशक्ती जागवणारे, ज्यांच्या  नसानसात आत्मविश्वास, धैर्य आदी गुणांनी संपन्न, असे भरदार शरीरयष्टीचे रावण. अनेक विषयात  त्यांनी पांडित्य मिळविले आणि महाज्ञानी म्हणून प्रसिद्ध झाले. अशा ताकदवान व्यक्तीमध्ये नवग्रहांना देखील ताब्यात ठेवण्याएवढी क्षमता होती. आजवरच्या इतिहासांत एवढे भव्य दिव्य व्यक्तीमत्व दुसऱ्या कुणाचे असेल असे क्वचितच घडेल. त्यांच्यासारखे कठोर तप करणे कोणासही शक्य नाही. त्यांनी  ब्रह्मदेवांना  प्रसन्न करुन घेण्यासाठी कठोर तप केले आणि अमरत्वाचे वरदान प्राप्त केले. निसर्ग नियमांच्या ते एकदम विरोधी होते. परंतु रावण यांची तपश्चर्या देखील दुर्लक्ष करण्यासारखी साधी बाब नव्हती.

 

रावण यांना दशमुखी असे देखील म्हंटले जाते याचा अर्थ दहा तोंडे असलेला, हा शाब्दिक अर्थ नक्कीच त्यांच्या महानतेकडे घेऊन जातो कि ते आपली बुद्धी दहापटीने जास्त वापरू शकत होते.

स्वतःच्या बुद्धी आणि शक्तीच्या  जोरावर प्रचंड कामगिरी करत ज्यांनी  साम्राज्य स्थापन केले आणि त्यांचे  संपूर्ण साम्राज्य हे समृद्धीने आणि सोन्याने परिपूर्ण होते असे  ते नायक रावण, म्हणूनच आजही त्यांना  लंकाधिपती आणि त्यांच्या  लंकेला आजही सोन्याची लंका म्हटली जाते.  



रामायणात रावण यांची प्रतिमा जरी वाईट असली तरी प्रभू रामचंद्र यांच्या चरित्राला अधिक उज्वल करण्यासाठी आणि चांगले व्यक्तिमत्व  प्रस्थापित  करण्यासाठी रावण यांचा  देखील हातभार होता, हे सत्य नाकारता येत नाही . भारतामध्ये रावण यांचे  अस्तित्व जरी नकारात्मक असले तरी अनेक ठिकाणी त्याची श्रद्धास्थाने आहेत आणि अनेक लोक त्यांची मनोभावे पूजा करतात.

 

काही अनपेक्षित वादळांमुळे जर त्यांचे  चरित्र मलीन झाले नसते तर, आज त्यांनी  उभारलेली त्यांची  प्रतिष्ठा लोकांसमोर कशी असती? मरणाच्या शेवटच्या क्षणी रावण यांनी जी शिकवण दिली ती तुम्हांस  त्यांची  दुसरी  बाजू जाणून घेण्यासाठी  नक्कीच प्रेरित करू शकेल.

 

राम यांनी  मारलेल्या त्या जीवघेण्या बाणाच्या प्रहारानंतर मृत्यूच्या दारासमोर असताना, राम यांनी  लक्ष्मणाला रावणाच्या जवळ जाऊन राजपाठाचे ज्ञान आणि माहिती घेण्यास सांगितले. काही वेळाने लक्ष्मण कुरकुरत आला कि " खलनायक इतके अहंकारी असतात कि मृत्यूच्या वेळी सुद्धा काही चांगल्या गोष्टी सांगू शकत नाहीत".  त्यावेळी  राम  स्वतः रावणाकडे गेले  आणि हात जोडून त्यांच्याकडे  चांगल्या गोष्टीची मागणी केली. रावणाने राम यांच्या  कडे पहिले आणि म्हणाले  " लक्ष्मण माझ्या डोक्याजवळ बसून मला ज्ञान देण्यासाठी आदेश देत होता पण तू खूप नम्रतेने माझ्या पायाजवळ बसून माझ्याकडे मागणी करत आहे,  तू एक नम्र विद्यार्थी आहेस आणि ज्ञानाचा अधिकारी देखील. माझ्याकडे खूप कमी वेळ आहे म्हणून मी तुला सखोल ज्ञान देऊ शकत नाही  परंतु मी तुला माझ्या जीवनातील एक महत्वाचा धडा सांगू इच्छितो. "

"आपल्यासाठी वाईट असलेल्या गोष्टी आपल्याला सहजपणे फूस लावतात; आपण अधीरतेने त्यांच्याकडे धावू लागतो परंतु ज्या गोष्टी तुमच्या स्वतःसाठी चांगल्या असतात त्या तुम्हाला आकर्षित करण्यासाठी असमर्थ होतात; आणि त्यामुळे आपण त्या चांगल्या गोष्टींना आपल्यापासून दूर ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करतो आणि वाईट गोष्टींच्या आहारी जातो, म्हणूनच मी गोष्टींच्या मुळाशी न जाता, तुला न भेटता सीतेचे अपहरण करण्याचा  उतावीळ पणा केला. हे माझ्या आयुष्याचे ज्ञान आहे, राम माझे शेवटचे शब्द मी तुला देतो. " या शब्दांत त्यांनी आपले प्राण त्यागले.

 

रावण यांच्या आयुष्यात एवढीच  चांगली बाजू आहे का ? त्यांच्या आयुष्याची एकच बाजू आपल्याला  इतकी वेळा सांगितली गेली आहे कि त्यामुळे आपल्याला खरे  रावण आणि त्यांचे  सत्य सापडणे कठीण  होऊन गेले.  त्यांच्या बद्दल तुम्हाला अजून  सविस्तर पणे जाणून  घेण्यासाठी रावण राजा राक्षसांचा हे पुस्तक अत्यंत उत्कृष्ठ राहील.







Posted on . Posted in Marathi Literature. Tagged Marathi Literature.

Categories

Tag cloud

Recent entries

Archive