Loader
Akshar Maifal

Akshar Maifal

Rs. 100 Rs. 90 10% OFF

Details

  • Language Marathi

  • Pages 132

  • Publish Year 2017

  • Publishers Akshar Maifal

Reviews

  • No Reviews written for this product. Be the first to write a review.

About the book

'अक्षर मैफल'च्या या दिवाळी विशेषांका सोबत आपली दिवाळी अधिक सुखाची आणि ज्ञानमयी होईल अशी आम्हा सर्वांना खात्री आहे! 

या विशेषांकामध्ये समाविष्ट असलेल्या काही लेखांची ही ओळख -

नीती आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य, अर्थशास्त्रज्ञ बिबेक देब्रोय यांनी आजच्या तारखेला जगाच्या प्राच्यविद्या क्षेत्रातला सर्वात मोठा प्रोजेक्ट असलेली 'भांडारकर संस्थेची महाभारताची चिकित्सक आवृत्ती' या अर्थशास्त्रज्ञाने एकहाती इंग्लिश भाषांतरित केली आहे. मुळातली १८ खंडातली मुख्यतः संस्कृत असलेली 'महाभारताची चिकित्सक आवृत्ती, या माणसाने इंग्लिशमध्ये भाषांतरित केली आहे. अक्षर-मैफलच्या पहिल्यावहिल्या दिवाळी अंकात बिबेक देब्रोय यांची दीर्घ मुलाखत असणार आहे.

लोकसंस्कृतीचे जेष्ठ आणि महान अभ्यासक रा. चिं. ढेरे यांच्या कडील खजिना म्हणजेच २० हजारांचा ग्रंथसंग्रह! राचिंच्या पुस्तक 'मिळवण्याच्या, साठवण्याच्या आणि अभ्यासाच्या पद्धतीवर', 'मुख्यतः वेडावर' लिहिणार आहेत त्यांच्या कन्या अरुणा ढेरे.

निसर्ग आणि मानवी मूल्यांची नैतिक ढासळण होत असलेल्या काळात हेन्री डेव्हिड थोरोचे विचार आपणा सर्वांचे पथदर्शक ठरणारे आहेत. 2017 हे या आधुनिक ऋषीचं 200 व जन्मशताब्दी वर्ष!

एकांत अनुभवायला म्हणून ऐन तारुण्यात हा माणूस वॉल्डन या तळ्याकाठी राहायला गेला आणि त्या 2 वर्षांच्या एकांतात त्याला शांततेने दिलेला दृष्टांत त्याच्या 'वॉल्डन' या श्रेष्ठ साहित्य कृतीतून आपल्यासमोर आजही उभा आहे. इंग्लिश समाजात शेक्सपिअर किन्वा डिकिन्स, मराठीत जसे ज्ञानोबा-तुकोबा तसाच अमेरिकेत थोरो, एक आधुनिक ऋषी! वाचा हेन्री डेव्हिड थोरो चं २१ व्या शतकाच्या भूमिकेतून महत्व, अक्षर-मैफलच्या दिवाळी अंकात.

आज आपण ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली काहीही बातम्या खपवतो. पण जेव्हा टीव्ही नव्हता. सोशल मिडिया तर नाहीच. पण आकाशवाणी आणि वृत्तपत्र यांच्याशिवाय बातमी कळण्याचे कोणतेही साधन लोकांपाशी नव्हतं. अशा काळात आणीबाणीसारखी 'ब्रेकिंग न्यूज' लोकांपर्यंत कशी पोहोचवली असेल? गणेश वसंत तोरसेकर म्हणजे आपले भाऊ तोरसेकर लिहितात 'ब्रेकिंग न्यूज', पत्रकार म्हणून कव्हर करतानाचे अनुभव. त्या अनुषंगाने बदलत गेलेली पत्रकारिता आणि बदलत जाणाऱ्या 'ब्रेकिंग न्यूज'चं स्वरूप सुद्धा!

'चिकित्सक आवृत्ती' म्हणजे नेमकं काय आहे, ते सांगणारा 'भांडारकर प्राच्यविद्या केंद्रातील' एक संशोधक अमृता नातू यांचा लेख, बदलेलेल्या युरोपचं चित्रण उभं करणारं एक 'प्रवास वर्णन' आणि बरेच काही...