Authors Seemantini Kher, Rajendra Kher
Language Marathi
Book Format Printed
Pages 640
Edition 1st
Publish Year 2019
Publishers Vihang Publication
भग्वदगीतेचे सिद्धान्त हे त्रिकालाबाधित आहेत. दुःख-संकटांवर मात करून अंतिम आनंदाचं ठिकाण गाठण्याचा मार्ग गीता प्रकाशित करते. प्राप्त जीवन कसं समृद्धपणे जगावं आणि आपला सर्वतोपरी उत्कर्ष कसा साधावा याचं गीता मार्गदर्शन करते. गीता अंधविश्वासाला थारा देत नाही. गीता तत्त्वज्ञान धर्माधर्मातीत आहे. या ग्रंथासाठी गीतेवरील जवळपास ५० टीकांचा संदर्भ घेतला आहे. सरळ-सोपी बोली भाषा हे या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे. अनेक नवे अर्थ, वेदोपनिषदांमधील संदर्भ, विज्ञान, भौतिक शोध, खगोलशास्त्र, पुरातत्वशास्त्र, परमानसशास्त्र, पुराणकथा, अनेक दृष्टांत कथा तसंच अनेक देशी-विदेशी गोष्टींचा अंतर्भाव मूळ श्लोकांचा अर्थबोध होण्यासाठी या ग्रंथात समाविष्ट केल्या आहेत. त्यामुळे नवी पिढी हे 'गीताशास्त्र' सहज समजावून घेऊ शकते असं या ग्रंथाचं स्वरूप आहे.