Loader
Zee Marathi Diwali Ank - Utsav Natyancha

Zee Marathi Diwali Ank - Utsav Natyancha

Rs. 100 Rs. 80 20% OFF

Details

Reviews

Average rating:

4.8 out of 5

(based upon 8 reviews)

 • 5 Star
  75.0%
 • 4 Star
  25.0%
 • 3 Star
  0%
 • 2 Star
  0%
 • 1 Star
  0%

 • 12 Oct 2017

  दिवाळी अंक २०१७

  उत्सव नात्यांचा हा दिवाळी अंक अत्यंत सुरेख आणि अप्रतिम आहे.

 • 12 Oct 2017

  Diwali Ank

  Super for reading (Prompt delivery by cart 91)

 • 12 Oct 2017

  दिवाळी अंक २०१७

  बेस्ट दिवाळी अंक...

 • 12 Oct 2017

  Zee Marathi Diwali Ank - Utsav Natyancha

  must read..great experience with Cart91, timely delivery

 • 13 Oct 2017

  Diwali Ank -- Utsav natyancha

  Good effort by Zee marathi.. nice

About the book

 उत्सव निर्मितीचा, उत्सव नात्यांचा, उत्सव सृजनाचा, उत्सव चित्रपटांचा, उत्सव आठवणींचा, उत्सव शीर्षकगीतांचा आणि उत्सव प्रतिसादाचा असे विभाग या अंकात करण्यात आले आहेत. ‘उत्सव निर्मितीचा’ या विभागात झी नेटवर्कच्या एक्झिक्युटिव्ह प्रेसिंडेट शारदा सुंदर यांच्यासह झी मराठी वाहिनी सुरू होताना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या निभावलेले नितीन वैद्य, भारतकुमार राऊत, माधवी मुटाटकर यांचे लेख आहेत. वाहिनीची सुरुवात अचानक कशी झाली, झी गौरव पुरस्कारांची सुरुवात, ‘आभाळमाया’ या पहिल्या दैनंदिन मराठी मालिकेची सुरुवात कशी झाली याबद्दलच्या गोष्टी, त्या वेळी आलेल्या अडचणी, आव्हानं याबद्दल या दिग्गजांनी लिहिलं आहे. ‘उत्सव नात्यांचा’ या विभागात सचिन पिळगांवकर, मृणाल कुलकर्णी, सुकन्या कुलकर्णी, आदेश बांदेकर यांच्यापासून जितेंद्र जोशी, अमृता सुभाष, अभिजित खांडकेकर, तेजश्री प्रधान यांच्यापर्यंतच्या २२ कलाकारांनी त्यांचं झी मराठीशी असलेलं नातं, त्यांच्या मालिकांबद्दलच्या आठवणींचा पट उलगडला आहे. ‘उत्सव सृजनाचा’ या विभागात महेश कोठारे, शशांक सोळंकी, श्रीरंग गोडबोले, मंदार देवस्थळी, रोहिणी निनावे, अशोक पत्की यांच्यापासून नीलेश मोहरीर यांच्यापर्यंतच्या १५ जणांनी आपल्या सृजनाचा उत्सव लेखांच्या रूपातून मांडला आहे. गीतं कशी सुचली, संगीत कसं दिलं, एखाद्या मालिकेची निर्मिती कशी झाली, पात्रं कशी निवडली वगैरे गोष्टींचा यात समावेश आहे. ‘माध्यमांतराची प्रक्रिया’ या लेखात त्याबद्दल झालेल्या एका परिसंवादात सहभागी झालेल्या मान्यवरांची मतं मांडण्यात आली आहेत. 

 
‘उत्सव चित्रपटांचा’मध्ये महेश मांजरेकर, अंकुश चौधरी, रवी जाधव, सतीश राजवाडे, सुबोध भावे आणि सादिक चितळीकर यांनी विविध रंजक गोष्टी सांगितल्या आहेत. सुबोध भावेनं लोकमान्य चित्रपटातल्या भूमिकेसाठी लोकमान्यांच्या डोळ्यांचा सहा महिने अभ्यास केला होता, तसंच चित्रपटांचं वितरण हे केवढं मोठं आणि गुंतागुंतीचं जाळं असतं, अशा गोष्टी या लेखांमधून कळतात. ‘उत्सव आठवणींचा’मध्ये संजय मोने, क्षितिज पटवर्धन यांचे लेख आहेत. त्यात अर्थातच आठवणी तर आहेतच; पण काही भाष्यही आहे. ‘चला हवा येऊ द्या’चे लोकप्रिय पत्रलेखक अरविंद जगताप यांनी टीव्हीला लिहिलेलं पत्रही यात आहे आणि हृषिकेश जोशी यांचं ‘टीआरपी’बद्दलचं खुमासदार प्रहसनही आहे (अंकाच्या प्रकाशन सोहळ्यात त्यांनी ते सादरही केलं होतं). ‘उत्सव शीर्षकगीतांचा’मध्ये गाजलेल्या मालिकांची गाजलेली शीर्षकगीतं आहेत. 
 
भावलेल्या मालिकांबद्दलच्या प्रेक्षकांकडून मागवण्यात आलेल्या लेखांपैकी सर्वोत्कृष्ट तीन लेखांना ‘उत्सव प्रतिसादाचा’मध्ये स्थान देण्यात आलं आहे. त्यासोबत पन्नास उत्तम लेखांच्या मानकऱ्यांची नावंही आहेत. मराठी मालिकांच्या सद्यस्थितीवर भाष्य करणारा जयदेव डोळे यांचा लेखही या भागात आहे. मालिकांच्या किंवा मालिकांच्या शीर्षकगीतांतल्या शब्दांचा लेखांच्या शीर्षकात केलेला कल्पक वापर हेही या अंकाचं एक वैशिष्ट्य सांगता येईल. मालिका किंवा चित्रपटांच्या निर्मितीबद्दल, कलाकारांच्या आयुष्याबद्दल, तसंच पडद्यामागच्या गोष्टींबद्दल प्रेक्षकांना प्रचंड कुतूहल असतं. ते बरोबर ओळखून ‘झी-मराठी’नं या दिवाळी अंकात नेमकं तेच उपलब्ध करून दिलं आहे.
 
एकंदरीत सांगायचं झालं, तर हा दिवाळी अंक एका वाहिनीचा असल्यामुळे त्यातलं बहुतेकसं साहित्य हे त्या वाहिनीशी निगडित आणि अर्थातच मनोरंजनाबद्दलचं आहे. त्यामुळे त्याचं साहित्यिक मूल्य किती, असा प्रश्नही उपस्थित केला जाऊ शकतो; पण माणसाच्या विविध भावना विविध प्रकारांतून मांडतं ते साहित्य, असं म्हटलं तर हा अंक त्या कसोटीवर नक्कीच उतरतो, मग भले तो एकाच विषयाला वाहिलेला का असेना! यात ‘झी मराठी’शी असलेलं कलाकारांचं नातं उलगडणारं स्मरणरंजनपर आणि ललित लेखन आहे, लोकांच्या ओठी रुळलेल्या शीर्षकगीतांच्या रूपातल्या कविता आहेत, मराठी मनोरंजन क्षेत्राबद्दलचं विचारमंथन आणि चर्चा करणारे मार्गदर्शनपर लेख आहेत आणि प्रत्यक्ष या वाहिनीसह मालिका, गीतं, चित्रपट, त्याचं वितरण अशा सगळ्यांच्या निर्मितीच्या रंजक कथाही आहेत... अलीकडे लोक जास्त वाचत नाहीत असं म्हणतात; निदान मनोरंजन या आवडीच्या विषयाच्या निमित्तानं तरी लोक वाचायला लागले, तर ती मनोरंजनविश्वानं साहित्यविश्वाला दिलेली मोठी भेट ठरेल, असं म्हणायला हरकत नाही.