Loader
क्रिकेट कसं खेळावं

क्रिकेट कसं खेळावं


Rs. 250 (सर्व कर समावेश)

Rs. 213 15% OFF

माहिती

प्रस्तावना

क्रिकेट-जगतातील सर्वश्रेष्ठ म्हणून सर्वज्ञात असलेल्या डॉन ब्रॅडमन यांचं क्रिकेट-कलेबाबत मार्गदर्शन करणारं बहुमूल्य पुस्तक.
''हा महान खेळ खेळण्याची सर्वोत्तम पध्दत कशी असावी आणि हा खेळ सर्वाधिक परिणामकारकतेने कसा खेळता येईल, याबाबत माझ्या काही कल्पना आहेत. ज्या पध्दती मला अगदी मनापासून योग्य वाटतात, अशाच पध्दतींचा मी या पुस्तकातून पुरस्कार केला आहे. मी खेळताना शक्यतो याच पध्दतींचा शंभर टक्के अवलंब करतो.
या पुस्तकात तुम्हाला या खेळाबाबतची कोणतीही क्लिष्ट अशी वैज्ञानिक स्पष्टीकरणं आढळणार नाहीत. मी जाणिवपूर्वक तसं करणं टाळलं आहे.
क्रिकेटबाबतच्या कोणत्याही पाठयपुस्तकात सांगितलेल्या गोष्टींपेक्षा सहसा खेळाडूचा व्यावहारिक 'कॉमन सेन्स'च अधिक परिणामकारक ठरतो.''
-डॉन ब्रॅडमन
विशेष वैशिष्टय
डॉन बॅ्रडमन यांच्या मूळ 'स्टॉप-मोशन' स्थिरचित्रांचा समावेश
या पुस्तकाची विशेष वैशिष्टयं
* डॉन ब्रॅडमन यांच्या मूळ 'स्टॉप-मोशन' स्थिरचित्रांचा समावेश
* परिणामकारक फलंदाजीसाठी योग्य पवित्रा कसा घ्यावा ते विविध फटके कसे मारावे याबाबत मार्गदर्शन
* गोलंदाजी, फलंदाजी, रनिंग बिटवीन द विकेट्स, क्षेत्ररक्षण व अंपायरिंग सर्वच बाबतीत महत्त्वपूर्ण सूचना
* अभिजात तंत्राबाबत बहारदार शैलीत मार्गदर्शन
सर डोनाल्ड जॉर्ज ब्रॅडमन
(27 ऑगस्ट 1908 - 25 फेब्रुवारी 2001)
'डॉन' म्हणून सर्वपरिचित असलेल्या ब्रॅडमन यांची क्रिकेटच्या इतिहासात सर्वकालिक थोर कसोटी फलंदाज म्हणून गणना होते. आपल्या कसोटी कारकिर्दीत त्यांनी 99.94च्या सरासरीने धावा जमा केल्या आणि एकंदरीत क्रीडाविश्वातच
ही मोठी महनीय कामगिरी समजली जाते.
आपल्या तरुणपणी केवळ क्रिकेटचा स्टम्प आणि गोल्फचा चेंडू इतक्या तुटपुंज्या साधनांनिशी त्यांनी कसा सराव केला वगैरे त्यांच्याबद्दलच्या अनेक आख्यायिका प्रसिध्द आहेत. ऑस्ट्रेलियन संघात प्रवेश केल्यावर केवळ दोन वर्षांत आपल्या कर्तृत्वाने ते तळपू लागले आणि कमालीच्या वेगाने त्यांनी विक्रमांची शिखरं पादाक्रांत केली. वयाची 22 वर्षं पूर्ण होईस्तोवर त्यांनी असे अनेक विक्रम नोंदवले जे आजतागायत कुणालाही मोडणं साधलेलं नाही. अत्यंत अल्पावधीत
ते क्रिकेटप्रेमींच्या गळयातील ताईत बनले.
डॉन ब्रॅडमन यांनी बारा वर्षं ऑस्ट्रेलियन संघाच्या कप्तानपदाची धुरा वाहिली. आपल्या कप्तानपदाच्या कारकिर्दीत एकदाही 'रबर' न गमावणारे कप्तान म्हणून त्यांची ख्याती आहे.
कप्तानपदी असो वा व्यवस्थापकपदी त्यांनी नेहमीच क्रिकेटचा खेळ आक्रमक आणि रंजक व्हायला हवा, अशी भूमिका स्वीकारली आणि प्रेक्षकांना या खेळाकडे मोठया संख्येने आकर्षित केलं.
1949 मध्ये त्यांना 'नाईट' किताब बहाल करण्यात आला, तर 2009 मध्ये 'आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेम' मध्ये त्यांचा समावेश करून त्यांना सन्मानित करण्यात आलं.

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.