Loader
धडपडणारी मुले

धडपडणारी मुले


Rs. 150 (सर्व कर समावेश)

Rs. 120 20% OFF

माहिती

प्रस्तावना

साने गुरुजींनी आपल्या साहित्याद्वारे एका पिढीचं पोषण केलं, हे म्हणणं अर्धसत्य आहे. गुरुजींचे साहित्य अजरामर आहे. प्रत्येक पिढीकडून हा वारसा पुढच्या पिढीला दिला जातो. मनाचे उत्तम पोषण करण्याचे कार्य गुरुजींचे वाङ्मय आजही करत आहे. याबरोबरच त्यांची पुस्तके जीवनातील सुख-दु:खांचे दर्शनही घडवतात. "धडपडणारी मुले' हा साने गुरुजींनी योजिलेल्या त्रिखंडात्मक कादंबरीचा पहिला खंड आहे. काही मुलांनी देश, देव आणि कुटुंब यासंबंधी काही ध्येय बाळगली होती. त्यासाठी धडपडणाऱ्या, हाल-अपेष्टा सहन करणाऱ्या अनेक तरुण मुलांचे आयुष्य या पुस्तकात अत्यंत कळकळीने चित्रित केले आहे. मुलांसाठी छात्रावास स्थापन करून त्यातील मुलांना आईच्या मायेेने जपणारे आणि त्यांना सुसंस्कारित करणारे स्वामीजी म्हणजे खुद्द साने गुरुजीच आहेत, याची प्रचीती स्वामींच्या पुढील बोलण्यातून येते. ""मुलांनी मला इथे खेचून आणलं आहे. उंच पर्वत इकडे तिकडे भटकणाऱ्या मेघांना ओढून घेतात, प्रचंड जंगल मेघांना ओढून घेतात, त्याप्रमाणे इतस्तत: भटकणाऱ्या मला, तुमच्या प्रेमळ व थोर हृदयांनी ओढून घेतलं आहे. तुमच्यात राहायला मी उत्सुक आहे. आपला हा सहवास एकमेकांना उत्साहप्रद, बलप्रद व स्फूर्तिप्रद होवो. आजपासून मी मुलांचा होत आहे. मुलं म्हणजे माझे देव,''

अभिप्राय

 • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.
शिपिंग बद्दल माहिती
 • लागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:
  • पुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • महाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • भारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर
 • सामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते
 • कॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध
आपल्यासाठी विशेष ऑफर
 1. ऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर
 2. पुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा

धडपडणारी मुले

धडपडणारी मुले

संबंधित पुस्तके