Loader
दिवटया

दिवटया

Rs. 300 Rs. 255 15% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

दलित साहित्यात आत्मकथनाला मोठे स्थान आहे. वर्षानुवर्षे अन्याय सहन करणारा, पिचलेला हा समाज आज थोडेफार चांगले जीवन जगत असला तरी ‘दलित’ शिक्का अजूनही पुसला गेलेला नाही. म्हणूनच या समाजातील अनेकांनी आत्मकथनातून झालेल्या अन्यायाचे चित्रण केले आहे. परिस्थितीचे चटके सहन केलेल्या खुशाल डवरे यांनीही ‘दिवट्या’ ही आत्मकथा लिहिली. पण त्यात इतरांकडून होणार्‍या अन्यायापेक्षा स्वतःमुळे कुटुंबावर झालेल्या अन्यायाचे चित्रण त्यांनी केले आहे. एका देवदासीमुळे त्यांच्या आयुष्यात ज्या घडामोडी घडल्या त्याबद्दल त्यांनी प्रामाणिकपणे लिहिले आहे. कोणालाही न दुखवता स्वतःच्या आयुष्याचा पट त्यांनी अलिप्तपणे मांडला आहे. म्हणूनच हे पुस्तक वेगळे ठरते.