Loader
गावगाडा शतकानंतर…

गावगाडा शतकानंतर…

Rs. 190 Rs. 152 20% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

‘मी पुन्हा विचार केला की आपली एवढी जमीन आहे, एवढा सेट-अप आहे. बरेचसे अनुभवी लोक आहेत, आपण भांडवलही खूप घालतो तरीही आपली परिस्थिती अशी का? आपल्या मूळ काम करण्याच्या पद्धतीतच काही चुका होत आहे का? की आपला स्वभाव शेतीला अनुकूल नाही? की शेती ही अशीच असते?’ हे त्यांच्यासमोर निर्माण झालेले प्रश्‍न आहेत. या प्रश्‍नांच्या उत्तरासाठी लेखक जेव्हा शोध सुरू करतात तेव्हा शेतीबाबत टीका करणार्‍या टीकाकारांच्या आक्षेपांचाही ते विचार करतात. हे लेखन समाजशास्त्रीय, शेतीविषयक लेखन म्हणून महत्त्वाचे आहेच, पण त्याबरोबरच ते गद्यलेखनाचा चांगला नमुना म्हणूनही महत्त्वाचे आहे. ‘शेती ही संस्कृती आहे. ती एक जीवनशैली आहे’ याचे तीव्र भान त्यांच्याजवळ असल्यामुळे संपूर्ण लेखनात तळमळ, जिव्हाळा ओतप्रोत भरून उतरलेला दिसतो. - नंदा खरे (माजी संपादक ‘आजचा सुधारक’)