Loader
गेशा ऑफ गिओन

गेशा ऑफ गिओन

Rs. 260 Rs. 221 15% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

जपान, जपानी माणसं, त्यांची पारंपरिक, कणखर मानसिकता, दीघरेद्योगी वृत्ती, आधुनिक जपानच्या घडणीतली त्यांची समर्पितता, तिथली प्राचीन संस्कृती, अनवट प्रथा-परंपरा, तिथले शूर सामुराई योद्धे, गेशा-संस्कृती या सगळ्याबद्दल आपल्या मनात कमालीचं कुतूहल असतं. एक तर तिथल्या बौद्ध धर्मामुळे आपलं त्यांच्याशी अंतस्थ नातं आहेच. त्यात जपानसंबंधीच्या काना-मनावर आदळलेल्या गूढरम्य कहाण्यांमुळेही त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला आपण उत्सुक असतो.
विशेषत: तिथल्या गेशा-संस्कृतीबद्दल असणाऱ्या कुतूहलामुळे आणि त्यासंबंधीच्या अर्धवट वा अत्यल्प माहितीमुळे आपल्या या औत्सुक्यात भरच पडली आहे. अशात एखाद्या गाजलेल्या, यशस्वी गेशेचं आयुष्य जगलेल्या कलावतीचं आत्मकथन आपल्या हाती पडलं तर..? तर ते अधाशासारखं वाचलं जाणार यात शंका नाही. मिनेको इवासाकी या गेशेचं (त्या स्वत:ला ‘गेको’ म्हणवतात.) ‘गेशा ऑफ गिओन’ हे प्रांजळ आत्मकथन गेशासंस्कृतीबद्दलच्या आपल्या समज-गैरसमजांचं जसं निराकरण करतं, तसंच साडेतीनशेहून अधिक वर्षे टिकून राहिलेल्या या पारंपरिक कलासंचिताचं अंतरंगही तपशिलात उलगडून दाखवतं.