Loader
माय कंट्री स्कूल डायरी

माय कंट्री स्कूल डायरी

Rs. 250 Rs. 225 10% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

भारतीय शिक्षण व्यवस्था पाहिली की शिक्षण संस्था म्हणजे साम्राज्य झाली आहेत. भारतातील बरेचशे शिक्षक खेड्यांत, अल्प सोयी, सवलतीत व खडतर परिस्थितीत शिक्षणाचे काम करीत असतात.
एक शिक्षकी शाळाही अनेक आहेत. याच शिक्षकावर इतर सरकारी कामेही करवून घेतली जातात. त्याच्यापुढे अध्यापनाचे काम दुय्यम ठरते. असे शिक्षक आपले अनुभव आपल्यासमोर मांडू शकत नाहीत. कारण शिक्षणिक क्षेत्रात मुख्य असणा-या विद्यार्थ्यासाठी तो फारसे काही करू शकत नाही.
अशा परिस्थितीत अमेरिकेतील डोंगराळ प्रदेशातील शाळेत शिक्षिकेचे काम करणा-या जुलिया वेबर गॉर्डन यांनी 'माय कंट्री स्कूल डायरी' हे पुस्तक लिहिले. १९३० मध्ये त्यांनी ज्ञानदानाचे काम सुरु केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिने विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावली.
त्यांना गायन, चित्रकला, नृत्य अशा अनेक कला शिकविल्या. आपल्या शिक्षणप्रवासाची चितरकथा त्यांनी यात चितारली आहे.
रोजनिशी स्वरुपात असणारे हे पुस्तक शिक्षणाविषयी तळमळ असलेल्या शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरेल. या पुस्तकाचा मराठी अनुवाद विद्या भागवत यांनी केला आहे.