Loader
पतंजली योगसूत्रे

पतंजली योगसूत्रे


Rs. 200 (सर्व कर समावेश)

Rs. 180 10% OFF

माहिती

प्रस्तावना

पातंजल योगसूत्रे' हा महर्षी पतंजलींनी सिध्द केलेला भारतीय योगपरंपरेतील महत्त्वाचा ग्रंथ होय.
चार पादात विभागलेल्या या ग्रंथात अष्टांग योगसाधनेची सूत्रात्मक पध्दतीने समग्र मांडणी केलेली आहे.
वायु पुराणात सूत्राची व्याख्या दिलेली आहे.
ती व्याख्या अशी- 'स्वल्पाक्षरं असंदिग्धं सारवत् विश्वतोमुखम्..' अर्थात् कमीतकमी अक्षरे, मांडणीतील असंदिग्धता, विषयाच्या साराने संपृक्त असलेली रचना आणि अर्थाच्या प्रकटनासोबत अभ्यासकाला विषयविश्वाकडे अभिमुख करणे ही सूत्राची वैशिष्टये होत.
व्याख्येत वर्णन केलेल्या सर्व गुणांनी 'पातंजल योगसूत्रे' मंडित आहेत.
कोणत्याही टप्प्यावरच्या योगसाधकासाठी पातंजल योगसूत्रांचा अभ्यास आवश्यक असतो.
साधनेतील प्रत्येक टप्प्यावर ही सूत्रे साधकासाठी नवा अर्थ घेऊन सामोरी येतात आणि साधकाची साधना अधिकाधिक सघन करत जातात हा या सूत्रांचा महत्त्वाचा विशेष आहे.
गेली ऎंशी वर्षे योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार अप्रतिहतपणे योगसाधनेत गढलेले आहेत.
त्यांच्या या दीर्घ साधनेतून त्यांना प्रतीत झालेला योगसूत्रांचा अन्वय या ग्रंथात त्यांनी अचूकपणे आणि सोप्या भाषेत योगसाधकांसाठी तसेच योगप्रेमींसाठी मांडलेला आहे.

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.
शिपिंग बद्दल माहिती
  • लागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:
    • पुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
    • महाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
    • भारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर
  • सामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते
  • कॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध
आपल्यासाठी विशेष ऑफर
  1. ऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर
  2. पुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा

पतंजली योगसूत्रे

पतंजली योगसूत्रे