Loader
प्रिय बाई

प्रिय बाई


Rs. 120 (सर्व कर समावेश)

Rs. 96 20% OFF

माहिती

प्रस्तावना

इटलीमधल्या एका खेड्यात राहणार्‍या आठ गरीब विद्यार्थ्यांनी शिक्षिकेला लिहिलेल्या या पत्रानं वाचकांच्या हृदयाचा ठाव घेतला.
हे पुस्तक साधंसुधं रोखठोक नि टवटवीत आहे.
आपल्याच मुलांचं मनोगत जणू बोलकं होत आहे.
ह्या पत्राचं एक वेगळेपण म्हणजे शिक्षणाकडे पाहण्याचा मुलांचा दृष्टिकोन आणि कोवळ्या वयातल्या कडू अनुभवांच्या चटक्यांनी आलेलं डोळस शहाणपण या पत्रातून दिसतं.
या गरीब मुलांनी शिक्षणपद्धतीवर ओढलेले कोरडे आपल्याला अंतर्मुख करतात, विचार करायला लावतात.
जिथं जिथं म्हणून मुलं शाळेबाहेर हकलली जातात त्या प्रत्येक देशात हे पुस्तक पोचलं पाहिजे असे या पुस्तकाच्या आठ लेखकांना वाटतं.
तुम्हाला नकोशी झालेली मुलं... त्यांच्याशिवाय शाळा ही शाळाच राहणार नाही.
आजार्‍याला नाकारून धडधाकट निरोगी माणसांची देखभाल करणारं इस्पितळ ठरेल ते!
आधीच असलेले भेदभाव आणखी पक्के करायचं ते साधन होईल.
खरं तर परीक्षाच नसाव्यात पण त्या घेतल्या तर किमान त्यात सचोटी तरी ठेवा.
जणू तुम्ही मुलांविरुद्ध युद्धच पुकारलं आहे!... हे विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी आहे का?
आईवडिलांची अशी एक छान संघटना असावी - तुम्हाला आठवण करून द्यायला - की तुम्हाला पगार आम्ही देतो आणि हा पगार आमची सेवा करण्यासाठी आहे.
आम्हाला शाळेच्या बाहेर हाकलून लावण्यासाठी नाही. ................
गेल्या वर्षी मी निरनिराळी पुस्तकं वाचली पण ‘लेटर टु अ टीचर’ नावाच्या एका चिमुकल्या पुस्तकाने माझी झोप उडवली...
जीवनात प्रत्यक्ष अनुभवांचे चटके बसायला लागले की लहान वयांतही कसं एक विलक्षण शहाणपण येतं याचं प्रत्यंतर हे पुस्तक वाचताना जागोजागी येतं...
हा काही कवितासंग्रह नव्हे. तरीदेखील गेल्या वर्षांत हे पुस्तक मी पुन्हापुन्हा वाचलं. - पु.ल. देशपांडे

अभिप्राय

 • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.
शिपिंग बद्दल माहिती
 • लागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:
  • पुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • महाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • भारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर
 • सामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते
 • कॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध
आपल्यासाठी विशेष ऑफर
 1. ऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर
 2. पुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा

प्रिय बाई

प्रिय बाई

संबंधित पुस्तके