Loader
राधाचं घर

राधाचं घर


(सर्व कर समावेश)

Rs. 250

माहिती

प्रस्तावना

छोट्या राधाचं घरातल्या प्रत्येकाशी काय नातं आहे ते या संचात चित्रांतून आणि शब्दांतूनही माधुरी पुरंदरे यांनी चित्रित केलं आहे.
मुलाचं मोठ्या माणसांशी असलेलं नातं आणि मोठ्या माणसाचं मुलाशी असलेलं नातं थोड्याफार फरकाने असंच असतं.
सुट्टीच्या दिवशी राधा आणि मीनाई दोघी मिळून पुस्तक वाचतात...
रोज सकाळी साखरनाना आणि राधा मिळून झाडांना पाणी घालतात...
पानाफुलांशी गप्पा मारतात...
राधा आणि बाबा सकाळी एकत्र अंघोळ करतात.
दोघं साबणाचा खूप फेस करतात, तरंगणारे फुगे फोडतात...
शिदूकाका नसला की घर कसं शांत, आळसलेलं वाटतं.
तो आला की एकदम ताजं टवटवीत वाटतं, पाऊस आल्यावर वाटतं तसं...
त्यामुळे हा संच मुलांसोबत मोठ्यांनाही आपलासा वाटतो.
मुलं आणि पालक दोघंही या पुस्तकांचा मिळून आनंद घेऊ शकतात.

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.