Loader
राशोमोन आणि इतर जपानी कथा

राशोमोन आणि इतर जपानी कथा

Rs. 120 Rs. 96 20% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

जपान हा आशिया खंडातला एक आधुनिक आणि पुढारलेला देश.
पण तरीही त्याची संस्कृती इतर पौर्वात्य देशांपेक्षा वेगळी आहे.
तशी ती राखून ठेवण्यात जपानने यश मिळवले आहे.
तर अशा या जपानवर पाश्चात्त्य तत्त्वज्ञान आणि साहित्य यांचा प्रभाव पडत असताना ऱ्युनोसुके अकुतागावा या लघुकथाकाराचा उदय झाला.
'जपानी लघुकथेचे जनक' म्हणवल्या जाणाऱ्या अकुतागावा यांच्या निवडक अकरा लघुकथांचा हा संग्रह.
१९१५ ते १९२२ या काळात लिहिलेल्या या कथा आहेत.
'राशोमान' ही १९१५ साली प्रकाशित झालेली कथा अकराव्या शतकात प्रकाशित झालेल्या दोन कथांवर आधारित आहे.
त्यावर चित्रपटही बनवले गेले.
जपानची संस्कृती, लोकव्यवहार, रूढी-परंपरा यांचं दर्शन काही प्रमाणात या कथांमधून होतं आणि अकुतागावा यांच्या लघुकथा लेखक म्हणून असलेल्या वेगळेपणाचंही.