Loader
संथ वाहते...?

संथ वाहते...?


Rs. 125 (सर्व कर समावेश)

Rs. 113 10% OFF

माहिती

प्रस्तावना

ज्यांनी मानवी संस्कृतीला आधार दिला, त्या नद्यांना आपण एकीकडे आई म्हणत म्हणत पूर्णपणे विद्रूप करून टाकले; इतके की आता त्यांना खरा चेहराच उरला नाही.
नद्या अशाप्रकारे बिघडल्याने आपल्यासाठी आपत्ती बनून राहिल्या आहेत.
त्यांचे स्वास्थ्य बिघडल्याने पिण्याचे पाणी, शेती, सभोवतालचे पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेवरही खोलवर परिणाम झाले आहेत.
उत्तर महाराष्ट्रातील पांजरेपासून मराठवाडयातील मांजरेपर्यंत आणि कोकणातील पाताळगंगेपासून चंद्रपूरच्या इरई नदीपर्यंत राज्यभर हेच चित्र पाहायला मिळत आहे.
त्यांच्यामुळे निर्माण झालेल्या समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहेत.
त्यामुळेच नद्या सुधारायच्या असतील तर काळजीपूर्वक आणि तातडीने पावले उचलावी लागतील!
भारतातील व जगभरातील नद्यांच्या र्‍हासाचा आढावा घेऊन लेखक अभिजित घोरपडे यांनी महाराष्ट्रातील नद्यांच्या आजच्या वास्तवाचा, प्रत्यक्ष त्यांच्या पात्रात उतरून सर्वंकष वेध घेतला आहे.

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.