Loader
सुशीलकुमार शिंदे : एका संघर्षाची वाटचाल

सुशीलकुमार शिंदे : एका संघर्षाची वाटचाल


Rs. 190 (सर्व कर समावेश)

Rs. 162 15% OFF

माहिती

प्रस्तावना

 • गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे हे चरित्र!
 • त्यांच्या या चरित्राला चपखल जोड मिळाली आहे, ती महाराष्ट्रातल्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय संदर्भांची!
 • त्यामुळे ही कथा प्रतिकूल परिस्थितीशी लढत स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडविणाऱ्या सुशीलकुमार शिंदे यांच्या या यशोगाथेशी समांतर अशी समाजाचीही आहे.
 • प्रतिकूल परिस्थितीशी अविरत झगडत गुणोत्कर्ष साधणाऱ्या एका माणसाची ही विलक्षण कथा आहे.
 • त्यांचे आयुष्य परिस्थितीच्या एकाच फटकाऱ्यात दारिद्र्यात लोटले गेले आणि त्यांना किती एक हाल-अपेष्टांना तोंड द्यावे लागले, या वास्तवाची ही कहाणी आहे.
 • पण त्यांच्यापाशी दुर्दम्य असा निर्धार होता, एकदा निश्र्चय केल्यावर न नमण्याचा स्वभाव होता, जिद्द होती, त्या बळावर एकामागून एक दुर्लघ्य असे अडथळेही त्याने पार केले.
 • आयुष्यातील धीटपणाच त्याच्यासाठी पाठबळ ठरला आणि त्याने विजयगाथा साकारली, त्याची ही वास्तवातली गोष्ट आहे.
 • शिंदे यांच्या समग्र आयुष्याचा हा आलेख आहे.
 • त्यांचे अगदी बालपणीचे दिवस, दहाव्या वर्षी शाळा सुटणे, बालमजूर म्हणून काम करणे, एका कारखान्यात कामगार होणे, दुसऱ्यांच्या लग्नाच्या मिरवणुकीत डोक्यावरून बत्ती घेऊन जाणे, घरसंसारासाठी पैसे मिळवण्यासाठी काय कामे करावी लागली होती, ते या ठिकाणी नमूद केले आहे.
 • दिवसभर राबायचे आणि शिक्षणाच्या ओढीने रात्रशाळेत शिकायचे हेच त्यांचे जीवन होते.
 • शिकण्यावाचून उन्नती नाही हे ओळखून ते कष्टातही शिकत राहिले.
 • महाविद्यालयात गेले आणि त्यांचे आयुष्य घडत गेले.
 • शिंदेंच्या प्रत्येक यशात त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा ठरला आहे.
 • सकारात्मकता हा त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण गुण आहे.
 • त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एक अंगभूत गुण म्हणजे आयुष्यात आव्हान पेलण्याची क्षमता. सुखाचा जीव धोक्यात का टाकायचा, असा पळपुटा विचार त्यांच्या मनाला कधी शिवला नाही.
 • "घे उडी बेधडक' या सूत्राने त्यांनी वेळोवेळी आव्हाने स्वीकारली.
 • "धावे त्याला मिळे गती आणि रस्ता सापडे' या सूत्राने ते यशस्वीही झाले. त्यांच्या कष्टांचे चीज झाले.
 • अशक्य आणि अवास्तव परिस्थितीला शक्यतेच्या व वास्तवतेच्या भूमीवर उतरवणारी ही कथा आहे.
 • सामाजिक- ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या प्रसंगांतून येथे शिंदेंचा जीवनप्रवास उलगडण्यात आला आहे.
 • मंत्री म्हणून वेगवेगळ्या खात्यांचे कार्यभार सांभाळताना, अर्थमंत्री म्हणून चढत्या भाजणीने कारकीर्द करताना, मुख्यमंत्री किंवा प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्य करताना, पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस किंवा आंध्रप्रदेशाचे राज्यपाल असताना त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या कामांच्या नोंदी येथे करण्यात आल्या आहेत.

अभिप्राय

 • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.
शिपिंग बद्दल माहिती
 • लागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:
  • पुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • महाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • भारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर
 • सामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते
 • कॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध
आपल्यासाठी विशेष ऑफर
 1. ऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर
 2. पुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा

सुशीलकुमार शिंदे : एका संघर्षाची वाटचाल

सुशीलकुमार शिंदे : एका संघर्षाची वाटचाल