Loader
तसव्या

तसव्या


(सर्व कर समावेश)

Rs. 200

माहिती

प्रस्तावना

  • शोषितांशी अजस्र धागा जुळलेला आहे माझा.
  • ‘तसव्या’ म्हणजे घनघोर अंधारातली पायवाट. भारतीय पुरुषप्रधान संस्कृतीने महिलेला सर्वश्रेष्ठतत्वाची उपमा दिली, तिला पूजनीय स्थळी नेऊन ठेवले अन् पडद्याच्या आडून तिला अबला ठरवून तिचे कितीतरीपट शोषण केले.
  • अन् तिच्या हाता-पायात कायम गुलामगिरीच्या बेड्या ठोकल्या. नव्या युगात महिला पुढे येत आहेत परंतु त्याचे प्रमाण किती टक्के आहे? ---
  • चाबकाचे एकामागोमाग फटकारे मारीत अशोक पवार भारतीय समाजव्यवस्था, मानवी संस्कृती आणि मध्यमवर्गीय सुसंस्कृत समाजाची व्यवस्थेबाहेर हद्दपार केलेल्या समूहाकडे पूर्ण दुर्लक्ष करणारी क्रूर, निबर संवेदनाहीन वृत्ती यावर प्रखर झोत टाकतात.
  • ते प्रश्‍न विचारीत नाहीत, कि कैफियत मांडत नाहीत. ते फक्त भटक्या, विमुक्त अशा दुर्लक्षित, वंचित, शोषित समूहांबद्दल लिहितात.
  • त्यांचे जीवन, माणसे. स्त्रिया, त्यांच्या कथा, त्यांची वणवण आणि केवळ जगण्यासाठी चाललेली विकल धडपड; आधुनिक भारतीय समाजाची माणुसकी किती ढोंगी, पोकळ आणि मतलबी आहे हे ते नकळत उघड करतात.
  • नुसती गोष्ट सांगून. उत्स्फूर्त शब्दांमधे. भाषेला अलंकार चढविण्याची, कलाकुसरीची त्यांना गरज नाही. या भटक्या पद-दलितांमधील स्त्री ही अधिकच दलित, शोषित, अत्याचारित.
  • अशा एका स्त्रीची कहाणी पवार यांनी प्रस्तुत ‘तसव्या’ या कादंबरीत रोखठोकपणे सांगितली आहे. ती वाचून मध्यमवर्गीय वाचकांना आपले तथाकथित नीतिमूल्यांचे जग भूकंपाच्या जबर हादर्‍याने पार डळमळून गेल्यासारखे होईल.
  • ती स्त्री म्हणजे कादंबरीची नायिका गिरिजा. शिक्षणाची ओढ असलेली, निर्घृण अत्याचार सहन करीत आपला सन्मान (डिग्निटी) न सोडता आयुष्यात थोडे तरी ‘सुख’ पाहता यावे म्हणून नियतीशी झगडणारी.
  • मराठी साहित्यातील लक्षणीय नायिकांमधे कधीतरी तिची गणना होईल अशी आशा आहे. -अरुण साधू, सुप्रसिद्ध कादंबरीकार

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.