Loader
तिच्या आरोग्यासाठी सर्व काही

तिच्या आरोग्यासाठी सर्व काही


(सर्व कर समावेश)

Rs. 325

माहिती

प्रस्तावना

  • तिच्या आरोग्यासाठी आजच्या जगण्यात सर्वच पातळ्यांवर संवाद नामशेष होताना दिसून येत आहे.
  • वैद्यक व्यवसायही त्याला अपवाद नाही. या धावपळीच्या आयुष्यात अनेक डॉक्टर्स इच्छा असूनसुद्धा रुग्णांशी संवाद करू शकत नाहीत.
  • दवाखान्यातील गर्दी पाहून रुग्णदेखील मनातील शंकाकुशंका प्रत्यक्ष डॉक्टरसमोर व्यक्त करण्यास संकोच करतात.
  • मग स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र नावाचा महासागर आणि सामान्य माणूस यांमधील एखादा सुबोध दुवा समाजासाठी गरजेचा ठरतो.
  • ‘तिच्या आरोग्यासाठी सर्व काही’ हे पुस्तक याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल.
  • वयात येणारी मुलगी, विवाहिता, गर्भवती ते रजोनिवृत्तीनंतर वृद्धापकाळाकडे झुकणारी स्त्री-अशा स्त्रीच्या आयुष्याच्या सर्व महत्त्वपूर्ण टप्प्यांवरच्या आरोग्य-प्रश्नांची माहिती, हे पुस्तक देते.
  • याचबरोबर निगेटिव्ह रक्तगट, जुली बाळे, उच्च रक्तदाब अशा अवघड गर्भावस्थासंबंधी उपयुक्त माहिती इथे दिली आहे.
  • पुरूष नसबंदीचे नगण्य प्रमाण, स्त्रीच्या आरोग्याबाबत पुरुषाची जबाबदारी, स्त्रियांचे उपवास आणि त्यांचा आरोग्याशी असणारा संबंध, व्यायाम आणि आरोग्य, स्थूलतेचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम- अशा अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर डॉ. किशोर अतनूरकर यांनी प्रस्तुत पुस्तकात आस्थेने लिहिले आहे.
  • स्त्रियांच्या मनात असणाऱ्या आरोग्याविषयक अनेक शंकांची उत्तरे या पुस्तकात नक्की सापडतील.

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.