Loader
व्योमकेश बक्षी रहस्यकथा संच

व्योमकेश बक्षी रहस्यकथा संच

Rs. 480 Rs. 432 10% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

  • बंगालीत अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या शरदिन्दू बंडोपाध्याय यांच्या या व्योमकेश बक्षीच्या गाजलेल्या रहस्यकथा रोहन प्रकाशननं मराठी वाचकांसाठी तीन भागांत आणलेल्या आहेत.
  • या तीन पुस्तकांत शरदिन्दूंच्या बारा कथा आपल्याला वाचायला मिळतात. त्यात त्यांच्या ‘शोजारूर काँटा’ (साळिंदराचा काटा), ‘मकोरशार’ (टॅरंटुलाचं विष), ‘अग्निबाण’ (जीवघेणी ज्वाळा- भाग १), ‘उपसंहार’ (जीवघेणे ज्वाळा- भाग २), ‘चित्रचोर’ (चित्रचोर), ‘चिडीयाखाना’ (प्राणिसंग्रहालय) या गाजलेल्या रहस्यकथांचा समावेश आहे.
  • आपल्या विशिष्ट अशा चित्रमय भाषाशैलीत शरदिन्दू या साऱ्या कथा सांगतात. त्यातली पात्रं आपल्या डोळ्यांसमोर उभी करतात.
  • या रहस्यकथांतील एखाद-दुसरी कथा सोडता बहुतेक कथा या कोलकात्याच्या परिसरात घडतात.
  • 'या रहस्यकथा म्हणजे परदेशी कथांची इकडून तिकडून केलेली उचलेगिरी नसून त्यातल्या सार्‍या कल्पना या मूळच्या माझ्या आहेत आणि त्या कथा या पूर्णपणे माझीच निर्मिती आहे,’ असं शरदिन्दूंनी ठासून सांगितलेलं आहे.