Loader

विहंग पब्लिकेशन

वर्णन: "प्राचीन साहित्य संस्कृतीतून समाजात सकारात्मक बदल घडविणे" या मिशनसह सन १९९८, ऑगस्टमध्ये विहंग प्रकाशनाची सुरुवात झाली. 'विहंग प्रकाशन' संस्थेची स्थापना माजी केंद्रीय मंत्री ना. शरद पवार यांच्या हस्ते १९९८ साली 'हिरोशिमा' या भा. द. खेर लिखित कादंबरीच्या निमित्तानं झाली. उत्तम आणि अभिजात साहित्य निर्माण करण्याचा आम्ही वसा घेतला आणि परिश्रमपूर्वक अनेक नवे विषय सुजाण वाचकांना दिले. अल्पकाळात 'विहंग प्रकाशन' संस्थेनं विषय, लेखन आणि निर्मिती या तिन्हींचा मेळ साधून आघाडीची मान्यवर प्रकाशन संस्था म्हणून नावलौकिक मिळवला. 'देह झाला चंदनाचा', 'गीतांबरी' 'धनंजय' 'वैदिक' अशा एकापेक्षा सरस 'बेस्ट सेलर' कादंबऱ्या आणि 'देवांच्या राज्यात' 'आर्य भारत' सारखी इतर अनेक पुस्तकं प्रकाशित करून साहित्यक्षेत्रात मानाचं स्थान मिळवलं. आमच्या पुस्तकांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि मानसन्मान लाभले आहेत. आम्ही चार भाषांमध्ये पुस्तकं प्रकाशित करतो. आम्ही अभिजात विषयांवरील कादंबऱ्या, प्राचीन सांस्कृतिक विषय, रहस्य-चमत्कृतीपूर्ण कादंबऱ्या, परीकथा प्रकाशित करतो. नकारात्मक विषय, शोकांतिका, निबंध, गौरवग्रंथ, कवितासंग्रह, लैंगिक विषय आम्ही प्रकाशित करीत नाही.

हिरोशिमा

Rs. 425 Rs. 361