Loader
Shyamachi Aai

Shyamachi Aai


Rs. 120 (Inclusive of all Taxes)

Rs. 108 10% OFF

Details

  • Authors Sane Guruji

  • Language Marathi

  • Pages 232

  • Book Format Printed

  • Edition 10th

  • ISBN 13 9788177866599

  • Publishers Saket Prakashan

About the book

१९५० - ६० च्या दशकात ज्या पिढीने जीवनातील पहिले एक दीड शतक पूर्ण केले होते, असा आजचा एकही जेष्ठ नागरिक नसेल की ज्याने त्याच्या बालपणी साने गुरुजींचे "श्यामची आई" हे पुस्तक वाचले नसेल. साने गुरुजींच्या श्यामची आई, मिरी अशा कादंबऱ्या वाचून ज्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या नसतील अशी व्यक्ती विरळच. अत्यंत साधी, सरळ पण काळजाचा ठाव घेणारी हृद्यस्पर्शी भाषा हे गुरुजींच्या लिखाणाचे वैशिष्य.

आईच्या प्रेममय थोर शिकवणुकीचे सरळ, साध्या व सुंदर संस्कृतीचे एक करुण व गोड कथात्मक चित्र म्हणजे 'श्यामची आई' असे म्हणता येईल. खुद्द गुरुजी म्हणतात की, ही कथा लिहताना हृदयातील सारा जिव्हाळा येथे ओतलेला आहे. या गोष्टी लिहीत असताना माझे डोळे शतावर ओले झाले होते. हृद्य गहिवरून व उचंबळून आले होते. माझ्या हृदयात मातेबद्दलच्या असणाऱ्या प्रेम, भक्ती व कृतज्ञता यांच्या अपार भावना श्यामची आई वाचून जर वाचकांच्या हृदयातही उत्पन्न होतील तर हे पुस्तक कृतार्थ झाले असे म्हणता येईल.

आपल्या मुलांवर अपार माया करणारी त्यांनी सुसंस्कारी बनावे म्हणुन झटापटणारी ; पण हे संस्कार उपदेशाच्या डोसाच्या रुपात मुलांना न पाजता स्वतःच्या वागण्यातून व दैनंदिन छोट्या-छोट्या प्रसंगातून मुलांच्या मनावर ते संस्कार बिंबवणारी आणि मुलांना शिस्त लावताना प्रसंगी कठोर बनणारी ही आदर्श आई आजच्या पिढीतील उगवत्या पिढीसाठीच नव्हे तर त्यांच्या आई- बाबांसाठीप्रेरक ठरेल, हे निश्चित.

Reviews

  • No Reviews written for this product. Be the first to write a review.